Tuesday, January 10, 2017

प्रार्थना - राहू दे अशीच देवा, कृपा तुझी माझ्यावर

🙏🏻 *प्रार्थना* 🙏🏻

राहू   दे अशीच  देवा कृपा तुझी माझ्यावर
तुच  घातले  जन्माला दाविले    जग    सुंदर   ॥धृ॥
पशू  पक्षी झाडे  वेली सजविली  छान  सृष्टी
आनंद  हा  जीवनाचा घेण्या  दिली तुच दृष्टी
रूप  तुझे   भासते  रे सर्व    काही    मनोहर
तुच  घातले  जन्माला दाविले   जग     सुंदर  ॥१॥
आली जरी कोणतीही संकटे   या  जीवनात
धावा   ऐकून  धावतो मदतीला  तु   क्षणात
राहू दे  आशिष  तुझा लेकराच्या    शिरावर
तुच  घातले  जन्माला दाविले   जग    सुंदर ॥२॥
न व्हावा कधी जीवन स्पर्श  ही  अहंकाराचा
वाहू   दे  वारा   विनम्र नेहमी      सदाचाराचा
दिले    भरभरून     तू"आणि काय मागू वर !"
तुच   घातले   जन्माला दाविले    जग    सुंदर   ॥३॥गीतकार -  पी.नंदकिशोर (प.शि.)जि.प.व.प्राथ.मराठी शाळा ,चंडिकापूरता.आकोट जि.आकोला 
गायन व निर्मिती - प्रविण डाकरे, प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता. शिराळा जि. सांगली 

वरील प्रार्थना डाऊनलोड करा खालील बटणावरुन व आवडल्यास जरुर इतरांना पाठवा.. 


No comments:

Post a Comment